ABOUT US
Otari Vadhuvar
ओतारी समाजातील सर्व तरुण मित्रानो आणि मैत्रिणींनो तसेच सर्व समाजबांधवांनो पुणे विभागातर्फे आपणा सर्वांचे या संकेत स्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत. हे संकेत स्थळ ( वेब साईट ) आपल्या समाजातील उपवर वधू व वरांसाठी व त्यांच्या पालकांसाठी पुणे विभागातर्फे तयार करण्यात आली आहे, या वेब साईटवर आपल्या समाजातील प्रत्येक वधू व वराला आपला बायोडाटा पाठवता येईल.व हा बायोडाटा अपलोड केल्या पासून संपूर्ण एक वर्ष या वेब साईटवर सर्वाना पाहण्यासाठीउप्लब्ध असेल,
हि वेब साईट तयार करण्यासाठी आपल्या समाजातील काही मान्यवरांनी पुणे विभागाला आर्थिक मदत केलेली आहे त्यांची नावे अनुक्रमे
- श्री रत्नाकर लक्ष्मणराव वांद्रे जळगाव जिल्हा
- श्री ओंकार राऊत अमरावती जिल्हा
- सौ गौरी गणेश ओतारी कल्याण ठाणे जिल्हा
- श्री मुकेश दयाराम वांद्रे अहमदनगर जिल्हा
- श्री धर्मपाल शेंडे नागपूर जिल्हा
- श्री राजेश वांद्रेकर उल्लाहसनगर ठाणे जिल्हा
- पुणे जिल्हा कार्यकारिणीने सुद्धा या संकेतस्थळासाठी आर्थिक मदत केली आहे
या सर्वांचा आर्थिक आधार आपल्या वेब साईट बनवण्यासाठी मिळाल्यामुळे आपण हे काम पूर्णत्वास नेऊ शकलो, त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ,हि वेब साईट आपल्या समाजाच्या कायम उपयोगी पडावी या साठी व हि वेब साईट अविरत सुरु ठेवण्यासाठी आपल्या सर्व समाजबांधवांचे आर्थिक व मानसिक साहाय्य लाभणे अत्यंत गरजेचे आहे.
या साठी आपण या वेब साईट वर रजिस्ट्रेशन करण्याकरिता नाममात्र फीस रुपये ५००/- ( पाचशे फक्त ) हि आकारण्यात येणार आहे आणि हे पैसे आपण आपल्या समाजाच्या पुणे जिल्ह्याच्या श्री कालिका देवीच्या ट्रस्टच्या नावे जमा करणार आहोत ज्यामुळे आपल्या माध्यमातून मिळणारा निधी हा समाजाच्या कार्यासाठीच वापरला जाईल. तरी आपण सर्वानी आपल्या या कामासाठी साथ द्यावी हि नम्र विनंती आहे
समन्वयक
दीपक सुधाकर साविलके
+919823235212